किनवट रेल्वे भुयारी पूल प्रकरणी दिल्लीत निर्णायक, सुनावणी
जुना गेट तात्काळ सुरू करण्याचे आदेश
किनवट शहरातील शिवाजीनगर येथील रेल्वे भुयारी पुल प्रकरणी दिल्लीत राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगात आज महत्त्वपूर्ण सुनावणी करण्यात आली आमदार भीमराव केला यांनी दाखल केलेल्या याचिकेवर नांदेडचे जिल्हाधिकारी कर्डिले आणि रेल्वे अधिकारी उपस्थित होते आमदार भीमराव केराम यांनी जनतेची बाजू ठामपणे मांडली ज्याला जिल्हाधिकाऱ्यांनी पुष्टी दिली.आयोगाचे अध्यक्ष आंतर सिंह आर्य यांनी जुना गेट तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले 28 जून 2025 रोजी जिल्हाधिकारी रेल्वेचे डी आर एम आमदार केराम आणि आयोगाचे अन्वेषक गोवर्धन मुंडे संयुक्त पाहणी करतील पुढील सुनावणी 21 जुलै 2025 रोजी होईल ज्यात रेल्वे बोर्ड आणि जीएम सिकंदराबाद यांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले या निर्णयामुळे स्थानिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे