Ticker

6/recent/ticker-posts

आदिवासी समाजाच्या सामाजिक प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत मंत्रालयाजवळ महिला आर्थिक विकास महामंडळ च्या सभागृहात संपन्न झाली.

आदिवासी समाजाच्या सामाजिक प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत मंत्रालयाजवळ महिला आर्थिक विकास महामंडळ च्या सभागृहात संपन्न झाली.

बंजारा घुसखोरीच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आदिवासी आमदार आणि आदिवासी समाज यांच्यात संवाद बैठक बुधवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी मुंबईत मंत्रालयाजवळ महिला आर्थिक विकास महामंडळ च्या सभागृहात संपन्न झाली.
यावेळी मंत्री महोदय माननीय नरहरी झिरवाळ,आमदार भीमराव केराम माजी मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावीत, आमदार डॉ. किरण लहामटे , आमदार आमश्या पाडवी , आमदार राजेश पाडवी , आमदार राजू तोडसाम, आमदार मंजुळाताई गावित , आमदार नितीन पवार , आमदार शिरीष नाईक , आमदार हिरामण खोसकर , माजी आमदार सुनील भुसारा , माजी आमदार डॉ. संतोष टारफे , माजी आमदार वैभव पिचड. हिना गावित इत्यादी उपस्थित होते.  विशेष म्हणजे सर्व आदिवासी लोकप्रतिनिधीनी सुमारे चार तास कार्यकर्ते , अभ्यासक यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले….एकंदरीत आदिवासींमधील संभाव्य घुसखोरिच्या धोक्याचा गंभीरतेने विचार केला गेला.राज्यभरात विविध तालुका व जिल्ह्यात आदिवासींचे मोठ मोठे मोर्चे सुरू आहेत. बंजारांचे मोर्चे त्यादृष्टीने फार कमी ठिकाणी निघालेत, त्या तुलनेत आदिवासी मोर्चे मोठ्या संख्येने निघत आहेत याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले…. व पुढील रणनीती आखली गेली….
एक मात्र निश्चित की आदिवासींनी घुसखोरी करू मागणाऱ्या धनगराना न्यायालयाच्या माध्यमातून थेट घरी बसवले तसेच आता असंवैधानिक मागणी करणाऱ्या बंजारांचे दिवास्वप्न कधीच पूर्ण होणार नाही यासाठी आदिवासी समाज व आदिवासी लोकप्रतिनिधी येणाऱ्या काळात योग्य ते पाऊल उचलतील.
संविधानाने दिलेल्या अधिकारांचे संरक्षण व समाजाच्या हक्क-अस्मितेचे रक्षण करण्यासाठी सर्व मान्यवरांनी एकमताने सहमती दर्शवली.
ही बैठक आदिवासी समाजाला न्याय व योग्य दिशा मिळवून देण्यासाठी ठरणार आहे