Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय जनता पार्टी (भा.ज.पा) किनवट शहर मंडळ कार्यकारणी जाहीर

          भारतीय जनता पार्टी (भा.ज.पा)
       किनवट शहर मंडळ कार्यकारणी जाहीर

भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कमिटीकडून मान्यता मिळाल्यानंतर किनवट विधानसभा क्षेत्रातील शहर मंडळाच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा आमदार भीमराव केराम व जिल्हाध्यक्ष अ‍ॅड किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर मंडळ अध्यक्ष
स्वागत आयनेनीवार यांनी केली आहे या कार्यकारिणीत एसटी मोर्चा अध्यक्ष संतोष पांडुरंग कनाके, चिटणीस अनिल संभाजी कनाके,
कृष्णा रामराव ईकटपेल्लीवार युवा मोर्चा अध्यक्ष, किसान मोर्चा अध्यक्ष जगदीश भगवानराव तीरमनवार, सौ पूनम मोहन दीक्षित महिला मोर्चा अध्यक्ष, शिवा भुमन्ना क्यातमवार ओबीसी मोर्चा अध्यक्ष, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष शंकर बापूराव भंडारे, अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्ष संतोष पांडुरंग कनाके, अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष अरबाज खान
या कार्यकारणीत उपाध्यक्षपदी जयराम वर्मा, नरसिंग तक्कलवार,
राजेंद्र भातनासे, आकाश भंडारे राहुल दारगुलवार, धीरज नेमानिवार
यांची निवड करण्यात आली, सरचिटणीस म्हणून बाळकृष्ण कदम ,सुनील मच्छेवार यांची नियुक्ती झाली आहे चिटणीस पदी अनिल संभाजी कनाके,कृष्णा कलकुंटवार, शिवाजी आंधळे कृष्णा बासटवार गणेश कोल्हे ,सौ विद्याताई सतीश पाटील,गंगुताई कचरू परेकार यांची निवड झाली आहे कोषाध्यक्षपदी सतीश बिराजदार यांची नेमणूक करण्यात आली आहे
नवनियुक्त संपूर्ण कार्यकारणीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात येत असून पक्ष संघटना अधिक संघटित व बळकट करून त्याच्या वाढीच्या दृष्टिकोनातून नव्या कार्यकारणी कडून सक्षम योगदानाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे