किनवट तालुका अध्यक्ष पदी अनिल कनाके सचिव पदी पवन मडावी यांची नियुक्ती करण्यात आली
(किनवट)दिनांक 11 जुण 2025 गोकुंदा येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समिती किनवट तालुका अध्यक्ष पदासाठीची बैठक ,राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर , राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर ,तसेच राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष प्रणय रमेश कोवे सर ,राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समिती नांदेड जिल्हाअध्यक्ष संतोष कन्नाके सर, यांच्या प्रमुख उपस्थितीत गेल्या आनेक दिवसापासुन प्रलंबित तालुका अध्यक्ष पद रिक्त असल्याने सर्वानुमते, पिंपळगाव (की) गावातील ग्रामपंचायत येथे सरपंच पदाची जबाबदारी सांभाळत आदिवासी बांधवांना न्याय मिळवून दिला त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत पिंपळगाव (की) गावचे माजी सरपंच अनिल संभाजी कनाके यांची किनवट तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली व समाजकार्यात अग्रेसर असणारे पवन मडावी यांची तालुका सचिव पदी नियुक्ती करण्यात आली .
राज्याध्यक्ष शंकर सिंह ठाकुर सर यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हणाले , ज्या काही आदिवासी समाजाच्या अडीअडचणी असतील त्या समस्या सोडवण्यासाठी आपली संघटना भक्कमपणे तुमच्या पाठीशी आहे. या संघटनेच्या माध्यमातून तुम्ही आदिवासी समाज बांधवांना न्याय मिळवून देण्याचा नक्कीच प्रयत्न कराल अशी आशा आणि अपेक्षा बाळगतो. मराठवाडा अध्यक्ष प्रणय कोवे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समिती च्या माध्यमातून ज्या ठिकाणी आदिवासी बांधवांवर व समाजावर अन्याय अत्याचार होईल त्या ठिकाणी आपण या संघटनेच्या माध्यमातून त्यांच्यावर होणारा अन्याय अत्याचार दूर केल्याशिवाय राहणार नाही यासाठी तुमच्या सर्वांची साथ भक्कमपणे मला हवी आहे सर्वांनी संयुक्तपणे मिळून काम करूया व समाजाला न्याय मिळवून देऊया अशी आशा आणि अपेक्षा सर्व पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली, मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर यांनी सूत्रसंचालन केलं व किनवट या ठिकाणी एक उत्कृष्ट अशी पदाधिकाऱ्यांची टीम या ठिकाणी उभी राहिली सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले, जिल्हाध्यक्ष संतोष कन्नाके यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले लवकरच जिल्ह्याच्या व तालुकाच्या बाकीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी, नव नियुक्त तालुकाध्यक्ष अनिल कनाके व मी नांदेड जिल्हाअध्यक्ष संतोष कनाके आम्ही दोघे मिळून बाकीच्या निवडी जाहीर करू असे सर्व पदाधिकाऱ्यांना आश्वासित केले.
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या किनवट तालुका अध्यक्षपदी अनिल कनाके व सचिव पदी पवन मडावी यांची निवड झाल्याबद्दल सर्वांनी अभिनंदन करून पुढील भावी कार्यास व वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, तसेच आमडी ग्रामपंचायत चे माजी सरपंच गोविंद पेंदोर यांचा आज वाढदिवस असल्याने सर्व पदाधिकाऱ्यांच्या समवेत वाढदिवस साजरा करून शुभेच्छा दिल्या
यावेळी राज्य कार्याध्यक्ष शंकर सिंह ठाकुर आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष प्रणय कोवे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ मराठवाडा अध्यक्ष मारुती शिकारे आदिवासी विकास समिती नांदेड जिल्हा अध्यक्ष संतोष कन्नाके नांदेड जिल्हा सचिव हर्षवर्धन कनाके सामाजिक कार्यकर्ता आशिष उर्वते,आमडी गावचे माजी सरपंच गोविंद पेंदोर, पराते सर , अरविंद पेंदोर, अजय मेश्राम ,फुलाजी येरमे
आदींच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृह गोकुंदा या ठिकाणी ही बैठक घेऊन ही निवड जाहीर करण्यात आली तालुका अध्यक्षपदी अनिल कनाके व सचिव पदी पवन माडावी यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या मित्र परिवारांकडून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत असल्याचे दिसून येत आहे.