डिजिटल मीडिया संपादक पत्रकार महाराष्ट्र राज्याची हिमायतनगर कार्यकारणी जाहीर हिमायतनगर तालुका अध्यक्षपदी नागोराव शिदे पळसपुरकर तर उपाध्यक्षपदी परमेश्वर सूर्यवंशी यांची निवड
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार महाराष्ट्र राज्याची हिमायतनगर कार्यकारणी जाहीर....
हिमायतनगर. नांदेड दिनांक....२२ रोजी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याची हिमायतनगर कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने सर यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रवीण खंदारे व तसेच सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार सन्मान करण्यात आला यावेळी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी हंबर्डे जिल्हा संघटक मौला शेख जिल्हा सहसचिव रफिक मौला यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले आहेत यावेळी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याच्या हिमायतनगर तालुकाध्यक्षपदी नागोराव शिंदे तर उपाध्यक्षपदी परमेश्वर सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली असून तसेच तालुक्यातील विविध पदांवरती आज पद नियुक्ती देण्यात आले आहेत यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे व त्यानंतर सर्व मान्यवरांचे संभाषण देखील पार पडले आहेत यावेळी चांदराव वानखेडे , अंगद सुरोशे, माधव कदम लक्ष्मण शेणेवाड, चंदनवार, सदाशिव पतंगे लक्ष्मणराव माने, विलासराव सुर्यवंशी, प्रभु कदम, यांच्या सह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.आहे