Ticker

6/recent/ticker-posts

डि.व्ही भालेराव ग्रंथालय लोकार्पण सोहळा,किनवट येथे 9 जून 2026 रोजी कार्यक्रमाचे अध्यक्ष: मा.आमदार भीमरावजी केराम व किनवटच्या नगराध्यक्षा कार्यक्रमाचे उद्घाटक मा.सौ. सुजाता एन्ड्रलवार यांच्या उपस्थितीत संपन्न होणार

किनवटमध्ये ९ जून रोजी 'डि.व्ही. भालेराव ग्रंथालया'चा भव्य लोकार्पण सोहळा; वाचन संस्कृती जपण्यासाठी भालेराव परिवाराचा स्तुत्य उपक्रम

किनवट (प्रतिनिधी):
पोलीस दलातील एक कर्तव्यदक्ष अधिकारी आणि साहित्याचे गाढे अभ्यासक स्वर्गवासी डी. व्ही. भालेराव (सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक) यांच्या स्मृती प्रित्यर्थ किनवट शहरात 'डि.व्ही. भालेराव ग्रंथालया'चा लोकार्पण सोहळा येत्या ९ जून २०२६ रोजी संपन्न होणार आहे. या माध्यमातून भालेराव परिवाराने आपल्या वडिलांचा वैचारिक वारसा पुढे नेत समाजासाठी ज्ञानाचे दालन खुले करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सोहळ्याचे अध्यक्षस्थान  किनवट माहूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा.भीमरावजी केराम साहेब भूषवणार असून, ग्रंथालयाचे उद्घाटन किनवटच्या नगराध्यक्षा मा. सौ. सुजाताताई एन्ड्रलवार यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे.
या प्रसंगी प्रमुख उपस्थिती: गेंदाबाई सोपान सूर्यवंशी, मथुराबाई विठ्ठल भोगे, नंदाबाई दत्तात्रय भालेराव. प्रमुख वक्ते: माननीय प्राध्यापक रामप्रसाद तौर ज्येष्ठ साहित्यिक, प्राध्यापक डॉक्टर मारोती कसाब, प्राध्यापक अशोक घायाळे साहित्यिक मार्क्सवादी विचारवंत. तर प्रमुख पाहुणे: प्राध्यापक डॉक्टर आनंद भंडारे प्राचार्य सरस्वती विद्यामंदिर कला महाविद्यालय किनवट, एडवोकेट सुभाष ताजणे ज्येष्ठ विधीतज्ञ किनवट. माननीय गणेश कराड वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन किनवट, प्राध्यापक डॉक्टर सुरेंद्र शिंदे बळीराम पाटील महाविद्यालय गोकुंदा, डॉक्टर पंजाब शेरे बळीराम पाटील महाविद्यालय गोकुंदा हे राहतील.
 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापिका डॉक्टर पूजा नंदा दत्तात्रय भालेराव हे करणार आहेत तर सूत्रसंचालन प्राध्यापक धनराज हलवले, प्राध्यापक धनराज पेंदोर हे करतील. कार्यक्रमाचे आयोजक कल्पवृक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,किनवटचे नितीन मंडाले, नारायण चव्हाण एडवोकेट सचिन दारवंडे, आशीर्वाद वासारके, नरेश भंडारे प्राध्यापक नरेश गेडाम, प्राध्यापक सुशील मेश्राम,राम आत्राम,ओम भुसारे हे आहेत.
स्वर्गवासी डी. व्ही. भालेराव हे केवळ पोलीस अधिकारी नव्हते, तर ते एक प्रगल्भ वाचक आणि साहित्याचे व्यासंगी होते. कोरोनाच्या कठीण काळात त्यांची प्राणज्योत मालवली, मात्र त्यांचा वाचनाचा छंद आणि विचारांची श्रीमंती जिवंत ठेवण्यासाठी त्यांचे चिरंजीव दीपक भालेराव, कन्या प्रा. डॉ. पुजा भालेराव आणि जावई श्री. व्यंकटेश कुंभार यांनी या ग्रंथालयाची संकल्पना आकारास आणली आहे.
विद्यार्थी आणि नागरिकांसाठी ज्ञानाचे केंद्र
किनवट सारख्या भागात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी, तरुण-तरुणी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी हे ग्रंथालय हक्काचे ठिकाण ठरेल. या ग्रंथालयाचा संपूर्ण आर्थिक भार भालेराव परिवाराने उचलला असून, ही केवळ पुस्तकांची जागा नसून ती 'विचारांचे विद्यापीठ' व्हावी, असा मानस आयोजकांनी व्यक्त केला आहे.
ग्रंथालयात कोणकोणती पुस्तके असावीत, याबाबत आयोजकांनी किनवटकर वाचकांकडून सूचना मागवल्या आहेत. आपल्या आवडीच्या आणि मार्गदर्शक पुस्तकांची नावे सुचवून या वाचन चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन प्रा. डॉ. पुजा भालेराव, दिपक भालेराव,आनंद भालेराव, रोशन भालेराव,स्वप्नील भालेराव आणि कल्पवृक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
दिनांक: ९ जून २०२६ (मंगळवार)वेळ: सकाळी १०.०० वाजता स्थळ: एज्यूकेशन ‘ट्री’ कोचिंग क्लासेस, राजेंद्र नगर, किनवट.
या ऐतिहासिक सोहळ्याला सर्व वाचकप्रेमी, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भालेराव परिवार व एज्यूकेशन ‘ट्री’ कोचिंग क्लासेस च्या वतीने करण्यात आले आहे.