क्रांतिवीर राजे बाबुराव शेडमाके यांची 193वी जयंती
किनवट येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
क्रांतिवीर राजे बाबुराव शेडमाके यांची 193वी जयंती किनवट येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी भव्य मिरवणूक रॅली व अन्नदान करण्यात आले
सर्वप्रथम किनवट येथील बाबुराव शेडमाके चौक येथे सर्व आदिवासी बांधवांच्या समवेत किनवट माहूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार भीमरावजी केराम यांचे ज्येष्ठ चिरंजीव क्रांतीशरण केराम, संदेश केराम,किनवटचे पोलीस निरीक्षक गणेश कराड, व सर्व आदिवासी बांधवांच्या समवेत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
व क्रांतिवीर राजे बाबुराव शेडमाके यांची जयंती अन्नदान व भव्य मिरवणूक काढून साजरी करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने सर्व समाज बांधव या जयंती सोहळ्याला उपस्थित होते.यावेळी आमदार भीमराव केराम यांचे ज्येष्ठ
चिरंजीव क्रांतीशरण केराम, गोकुंदा(सरपंच)ग्रामपंचायत सदस्य संजय सिडाम, ट्रायबल सेवा न्यूज संपादक प्रणय कोवे, संतोष कनाके, नगरसेवक संतोष मरसकोल्हे, विष्णू पेंदोर,अनिल कनाके, आशिष उर्वते, पराते सर, फुलाजी येरमे, पेंदोर सर, नागनाथ गेडाम, स्वीय सहाय्यक प्रकाश कुडमेते आदींची उपस्थिती होती सर्वांच्या समवेत हा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला