बुधवार दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी रोजी आजाद समाज पार्टीच्या वतीने राळेगाव पोलिस स्टेशनला सायंकाळी 5:30 वाजता आदिवासी समाजाची बदनामी करणाऱ्या संघटना व त्या प्रकरणाला तुल देणाऱ्या व्यक्ती.. ह्या संपूर्ण घटनेला कुठंलाही पुरावा नसतांना नाहक आदिवासी समाजाची बदनामी करणाऱ्यावर अनुसूचित जाती/ जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्या अंतर्गत दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावे.. व त्या सर्व संघटना ज्यांनी मोर्चे काढले व राळेगाव बंद केला आणि आदिवासी मुलींची तस्करी झाली असा आरोप केला अश्या बिनडोक संघटनांना बंदी घालण्यात यावी अशी मागणी आझाद समाज पक्षाच्या वतीने करण्यात आली..
कुठलाही पुरावा. तक्रार व चौकशी न करता आदिवासींच्या 34 मुली विकण्याची व त्यांचा वापर देह व्यापारासाठी व अनैतिक कामासाठी होतो अशी खोटी बातमी व्हॉट्स ॲप फेस बुक व दैनिक वृत्तपत्र आणि TV ह्या प्रसारमाध्यमातून फक्त स्टँडबाजी व वहावाही लुटण्याच्या लालशे पोटी प्रसारित करण्यात आली ह्या घटनेला कुठलेही तथ्य नसून ही सर्व माहिती खोटी आहे असे ही प्रसार माध्यमातूनच सांगण्यात आले... त्यामुळे आदिवासी समाजाला नाहक बदनाम करण्याचे क्षडयंत्र व प्रसिद्धी साठी ही स्टँडबाजी केली असल्यामुळे त्या सर्व लोकांवर अनूसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्या अंतर्गत दोषीवर कारवाई करून ह्या प्रकरणात समर्थन करणाऱ्या बिनडोक संघटनांवर प्रतिबंध लावण्यात यावा.. अन्यथा आदिवासी समाज आजाद समाज पक्षाच्या नेतृत्वात तीव्र निषेधासह आंदोलन करेल असा इशारा
अध्यक्ष डॉ मदन वरघट, मेजर जीवन कोवे, आनंद जिवने, ज्योत्स्ना ताईं उईके, रेखाताई थूल, बिपीन सिडाम, अनिल गेडाम. राहुल मुन, भीमराव काळे, लक्ष्मण पंधरे, विनायक थूल, महेश सीडाम, संतनू सलामे, दिनेश करपते, गणेश उईके, मनोज पेंदाम, आयुष उईके,
राहुल किंनाके. पंकज तोडसे, ह्या कार्यकर्त्यांनी दिला..