Ticker

6/recent/ticker-posts

नगरसेवकाकडून दिव्यांग सफाई कर्मचाऱ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर कार्यवाही नाही झाल्याने किनवट नगर परिषद कर्मचारी आंदोलनाचा दुसरा दिवस

नगरसेवकाकडून दिव्यांग सफाई कर्मचाऱ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर कार्यवाही नाही झाल्याने किनवट नगर परिषद कर्मचारी आंदोलनाचा दुसरा दिवस 
किनवट, 
किनवट नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील दिव्यांग कर्मचारी नरसिंग गंगाराम रामणवाड हे सुभाष नगर पाण्याच्या टाकीवर आपले कर्तव्य बजावत होते.घरांचे बांधकाम चालू असून त्याच्या साठी मी नगरसेवक अभय नगराळे आहे मी सांगितल्या नंतर पाणी का सोडला नाही म्हूणन दिनांक 18/04/2026 रोजी अपमानास्पद भाषा वापरून रामणवाड यांना शिवीगाळ व मारहाण केली 
     नगर परिषद संघटना तर्फे काम बंदचा दुसरा दिवस चालू असून या आंदोलनामुळे किनवटमधील पाणीपुरवठा, स्वच्छता, अग्निशमन आणि वीज देखभाल यांसारख्या अत्यावश्यक सेवांवर गंभीर परिणाम उद्या पासून जास्त होऊ शकतो. या संपादरम्यान जनतेला होणाऱ्या कोणत्याही गैरसोयीसाठी नगर परिषद कर्मचारी जबाबदार राहणार नाही. 
तसेच सोमवार पासून महाराष्ट्र राज्य भर सर्व कर्मचारी काळ्या फिती लावून निषेध करणार आहेत.या संपात किनवट नगर परिषद संघटनेचे अध्यक्ष किरण कालगोटूवार, राजु पिल्लेवार, क्षितिज समुखराव, सुरेश पुरुडवार, मिलिंद घुले, नरसिंग रामनवाड, सय्यद जमीरोद्दीन, वसंत नगराळे, परमेश्वर कचमोडे, सटवा डोकळे, लक्षमण कोल्हे, शेख रियाज, राकेश कुंटलवार, रवी उपरपवार, शेख मजित, गजानन गाडगे, राजु तुम्मलवार, अजय मंत्रिवार, साहील कशेटवार, राजु उदगीरवार, अनिल माहूरकर, निखिल वाघाडे, व्यंकटेश मुखनेपेल्लीवर,तथागत येरेकार,बाबु कल्पल्लीवर, शिवलिंग अंनेलवार, संदीप ढंडोरे, अतिक खान,तौफिक खान, राजेश बाम्हाणे, नरेश गोटे, मनोज सकापेल्लीवर, शेख युसूफ सह एकूण 75 कर्मचारी सहभागी आहेत.