किनवट व माहूर तालुक्यातील काही मंडळांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा झालेली असताना, काही मंडळांमध्ये अद्याप रक्कम न मिळाल्याने या पार्श्वभूमीवर बालाजी आलेवार यांनी इस्लापूर शेतकऱ्यांची भेट घालून दिली किनवट-माहूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय भीमरावजी केराम यांनी आज इस्लापूर मंडळाला भेट देऊन शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत विविध विषयांवर चर्चा केली.
शेतकऱ्यांना संबोधित करताना आमदार केराम यांनी संबंधित यंत्रणेशी पाठपुरावा सुरू असून, उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यातही लवकरच पीक विम्याची रक्कम जमा होईल, असा विश्वास व्यक्त केला.
या भेटीदरम्यान स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.