Ticker

6/recent/ticker-posts

आमदार भीमराव केराम यांच्या पाठपुराव्याला यश रस्त्याच्या दुरावस्थेची दिल्लीत दखल सरसम कोठारी रस्त्याच्या गुत्तेदाराला ब्लॅकलिस्ट करा नव्या टेंडरचे गडकरींचे आदेश

धनोरा ते भोकर राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट दर्जाच्या कामाची केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गंभीर दखल घेत संबंधित गुत्तेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचे तसेच त्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत या सोबतच सरसम ते कोठारी दरम्यानच्या रस्त्याचे नव्याने टेंडर काढून दर्जेदार काम करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत आज नवी दिल्ली येथे आमदार भीमराव केराम यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेत धानोरा व भोकर राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेबाबत सविस्तर चर्चा केली यावेळी सरसम ते कोठारी दरम्यानच्या रस्त्यावरील मोठे मोठे खड्डे भेगा तसेच निकृष्ट दर्जाच्या कामाचे फोटो व व्हिडिओ त्यांनी गडकरी यांना दाखविले या महामार्गावर वारंवार होत असलेल्या अपघाताची माहिती देत नागरिकांच्या जीवितवास निर्माण झालेला धोका देखील त्यांनी निदर्शनास आणून दिला
रस्त्याची अवस्था पाहून संतप्त झालेल्या गडकरी यांनी तात्काळ महाराष्ट्र राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता तथा नॅशनल हायवे प्राधिकरणाचे अध्यक्ष अभियंता संतोष गजानन शेलार यांच्याशी दूरध्वनी वर्ण संपर्क साधला संबंधित गुत्तेदाराला तातडीने ब्लॅकलिस्ट करण्यासह
त्यांच्यावर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे तसेच सरसम ते कोठारी रस्त्याचे नव्याने टेंडर काढून काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत धनोरा भोकर मार्ग हा विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग असून गेल्या काही महिन्यांपासून या महामार्गावरील निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे ठिकठिकाणी पडलेले खड्डे उघडलेल्या डांबरीकरणाचा थर आणि रस्त्यावर पडलेल्या भेगांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात होता दरम्यान या रस्त्याच्या दर्जेदार दुरुस्तीसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच नागरिकांना सुरक्षित आणि चांगला रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार केराम यांनी यावेळी केली गडकरी यांनी या प्रकरणात कठोर भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे