Ticker

6/recent/ticker-posts

शाळेतील समस्यांची संदेश केराम यांनी घेतली दखल माहूर तालुक्यात युवा नेते संदेश केराम यांचा दौरा.स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी दिल्या सूचना

शाळेतील समस्यांची संदेश केराम यांनी घेतली दखल
माहूर तालुक्यात युवा नेते संदेश केराम यांचा दौरा.
स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी दिल्या सूचना
युवा नेते संदेश केराम यांनी तालुक्यातील विविध गावांचा दौरा करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांच्या अडचणी आणि मूलभूत गरजांचा आढावा घेतला यावेळी शाळांमध्ये उपलब्ध सुविधा पायाभूत सोयी तसेच आवश्यक सुधारणा याबाबत संबंधितांशी चर्चा करण्यात आली
संदेश केराम यांनी रुई ,अनमाळ ,दिगडी खुर्द, हिवळेश्वर ,महादापूर, आणि शिवुर, येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना भेट देत शिक्षक व ग्रामस्थांशी संवाद साधला विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले
यानंतर महादापूर येथील पुलाच्या दुरावस्थेची प्रत्यक्ष पाहणी करून पुलाची स्थिती जाणून घेतली नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीच्या दृष्टीने हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी संबंधित यंत्रणेला आवश्यक सूचना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली
या दौऱ्यात तालुका मंडळ अध्यक्ष नीलकंठ मस्के, आमदारांचे स्वीय सहाय्यक प्रकाश कुडमेथे, जनसंपर्क अधिकारी संतोष मरसकोल्हे, जीवन अग्रवाल, सुभाष कोहाड, देवेंद्र कोवे, आमदाराचे आरोग्य दूध अमन कुंडगीर, विशाल खरे, बालाजी मडावी, प्रीतम गेडाम, श्यामराव कुमरे, शिवा पवार, अनिल कनाके, आशुतोष बेंद्रे, व्यंकटेश गीते, रवी रपणवाड, तसेच संदेश भाऊ केराम मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते