Ticker

6/recent/ticker-posts

किनवट येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा

किनवट येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा
किनवट येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा जागतिक आदिवासी दिनाची सुरुवात ही रॅली काढून करण्यात आली या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी बंधू भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले
 आदिवासींची एकता अस्मिता आदिवासींचा स्वाभिमान या रॅली मधून पाहायला मिळाला या रॅलीचा मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते वीर बाबुराव शेडमाके चौक अण्णाभाऊ साठे चौका मधून रॅली समोर छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली त्यानंतर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ चौकातून ही राहिली बिरसा मुंडा चौकामध्ये जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने बिरसा मुंडा पुतळ्याला हार अर्पण करून सर्व आदिवासी बांधवांच्या समवेत किनवट माहूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार तसेच युवा नेतृत्व संदेश केराम व सर्व आदिवासी बांधवांच्या समवेत विनम्र अभिवादन करण्यात आले
त्यानंतर जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला हार अर्पण करून सर्व मान्यवरांच्या समवेत विनम्र अभिवादन करण्यात आले
यानंतर किनवट माहूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार भीमरावजी कदम साहेब यांचा सत्कार करण्यात आला तसेच युवा नेतृत्व संदेश केराम यांचा सत्कार करण्यात
यानंतर आदिवासी पारंपारिक नृत्य सादर करण्यात आलं   
 त्याचप्रमाणे ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी  उज्वल असं यश मिळवलं त्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला माझी सैनिक यांचा सुद्धा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी  सत्कार करण्यात आला
 आदिवासी सेवक यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात आला  या कार्यक्रमाला माझी जिल्हा परिषद  जनाबाई डुडुळे,नंदिनीताई टारपे,माजी नगराध्यक्ष साजिद खान, माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, माजी नगराध्यक्ष के मूर्ती , माजी पंचायत समिती सभापती दत्ता आडे, मारोती सुंकलवाड, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ढोले, आदिवासी सेवक दादाराव टेकाम, गोपीनाथजी बुलबुले गोपाल कनाके नगरसेवक संतोष मरसकोल्हे,आदी मान्यवर या कार्यक्रम सोहळ्याला उपस्थित होते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. 
यावेळी आयोजक समितीच्या वतीने लोकप्रिय आमदार भीमराव जी केराम यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर मान्यवरांची या ठिकाणी जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने मान्यवरांची भाषणे या ठिकाणी झाली आदिवासीचे अस्मिता परंपरा या सगळ्या गोष्टीवर या ठिकाणी प्रकाश टाकल्या गेला लोकप्रिय आमदार भीमरावजी केराम त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं या कार्यक्रमाची सांगता अल्प उपहाराणे करण्यात आली या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात आदिवासी जनसमुदाय उपस्थित होता अतिशय उत्साहमध्ये हा आदिवासी जागतिक दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्यांनी मेहनत घेतली विविध माध्यमातून ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करण्यात आले