Ticker

6/recent/ticker-posts

गोलाकर्जी येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य रॅली; पारंपरिक ग्रामसभेतून आदिवासी एकतेचा जागर

गोलाकर्जी : सामूहिक ग्रामसभा पारंपरिक पद्धतीच्या वतीने ९ ऑगस्ट २०२६ रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आदिवासी समाजाची अस्मिता, संस्कृती, परंपरा, शैक्षणिक व सामाजिक प्रश्न तसेच पारंपरिक आणि संविधानिक अधिकारांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर गोटूल भूमी सल्लागांगरापासून मुख्य चौक, मेन रोड बस स्टॉप गोलाकर्जीपर्यंत भव्य रॅली काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. या रॅलीत परिसरातील पारंपरिक ग्रामसभा, गाव पाटील, भूमिया, गायता, पेशा, पुजारी तसेच विविध गावांतील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पत्रिकेतून करण्यात आले होते.
संयुक्त राष्ट्र संघाने आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून घोषित केला आहे. या दिनाचे औचित्य साधून आदिवासी समाजाच्या अस्तित्व, अस्मिता, संस्कृती, परंपरा आणि हक्कांचे जतन करण्यासाठी एकजुटीने पुढाकार घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तिरुमाल कोवे महाराज, प्रमुख पाहुणे तिरुमाल डॉ. के. डी. मडावी होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष तिरुमाल बंडू सिडाम, भूमक तिरुमाल डॉ. कोडापे सर, तर प्रमुख अतिथी म्हणून तिरुमाल सत्यनारायण कोडापे सर, तिरुमाल शिवाजी नरोटे यांची उपस्थिती नियोजित होती. विशेष अतिथींमध्ये तिरुमाल एम. एस. सिडाम व तिरुमाल राहुल पोरेटेट यांचा समावेश होता.
या उपक्रमातून आदिवासी समाजातील एकता, पारंपरिक ग्रामव्यवस्था आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा संदेश देण्यात आला. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सामूहिक ग्रामसभा पारंपरिक पद्धतीतील ग्रामसभांच्या वतीने करण्यात आले.