Ticker

6/recent/ticker-posts

गावातील वीज समस्या गावकरी व महावितरण कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने सुरळीत*

*कमठाला गावातील वीज समस्या गावकरी व महावितरण कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने सुरळीत*

किनवट / मारोती देवकते

कमठाला गावातील वीजपुरवठा करणाऱ्या रोहित्राच्या (ट्रान्सफॉर्मर) बुशिंगमध्ये बिघाड झाल्याने गावातील वीजपुरवठा खंडित होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे गावकऱ्यांना रात्र अंधारात काढावी लागण्याची शक्यता निर्माण झाली होती.

ही बाब गावातील सुनील पाटील कऱ्हाळे व पत्रकार मारोती देवकते यांनी संबंधित लाईनमन भंडारे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर लाईनमन भंडारे यांनी तातडीने आपल्या सहकाऱ्यांना बोलावून रोहित्राची पाहणी केली व दुरुस्तीचे काम तत्काळ सुरू केले.

महावितरण कर्मचाऱ्यांनी वेळ न दवडता आवश्यक दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे कमठाला गावावर ओढवलेला अंधाराचा धोका टळला असून गावातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.
या कामासाठी महावितरणचे लाईनमन भंडारे, योगेश कल्याणकर, मयूर दोनकलवार, राम चौधरी,तसेच गावातील सुनील पाटील कऱ्हाळे, पत्रकार मारोती देवकते, संदीप कऱ्हाळे व उमेश भोयर यांनी सहकार्य केले.

गावकऱ्यांनी वीज समस्या निदर्शनास आणून दिल्यानंतर महावितरण कर्मचाऱ्यांनी तत्काळ दखल घेऊन दुरुस्तीचे काम केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.