माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार
किनवट : आदिवासी समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व हक्कांच्या प्रश्नांवर व्यापक जनजागृती करण्याच्या उद्देशाने किनवट येथे आदिवासी धर्म चिंतन परिषद व आदिवासी क्षेत्र बंधमुक्ती दिवस आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी रविवार, २३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता गोंकुंदा येथील शासकीय विश्रामगृहात महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीस माजी सामाजिक न्यायमंत्री मा. श्री. शिवाजीराव मोघे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. आगामी २० सप्टेंबर रोजी होणाऱ्या आदिवासी धर्म चिंतन परिषद व क्षेत्र बंधमुक्ती दिनाच्या कार्यक्रमाचे नियोजन, विविध समित्यांची स्थापना तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर सोपविण्यात येणाऱ्या जबाबदाऱ्यांबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
आदिवासी धर्म, कोड, क्षेत्र बंधमुक्ती दिवस, आदिवासी समाजाची संस्कृती व परंपरा, संविधानिक हक्क, शेतकरी व युवकांचे प्रश्न, शिक्षण, रोजगार तसेच आदिवासी अस्मिता आणि अस्तित्व या विषयांवर व्यापक विचारमंथन व जनजागृती करण्याच्या दृष्टीने २० सप्टेंबर रोजी होणारी परिषद महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या पार्श्वभूमीवर आदिवासी नेते, कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच विविध आदिवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी २३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या पूर्वतयारी बैठकीस आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली शाखा नांदेड व समस्त आदिवासी संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.
बैठकीचे ठिकाण : शासकीय विश्रामगृह, गोंकुंदा, ता. किनवट
दिनांक : रविवार, २३ ऑगस्ट २०२६
वेळ : सकाळी ११ वाजता
आदिवासी समाजाच्या हक्क, अस्मिता आणि अस्तित्वासाठी एकजुटीने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.