Ticker

6/recent/ticker-posts

किनवटमध्ये ‘जिजाऊ बस’चा शुभारंभ; आमदार भीमरावजी केराम यांच्या हस्ते उद्घाटन

किनवटमध्ये ‘जिजाऊ बस’चा शुभारंभ; आमदार भीमरावजी केराम यांच्या हस्ते उद्घाटन
महिला व विद्यार्थिनींसाठी सुरक्षित, सुलभ आणि सुविधाजनक प्रवासाचा नवा पर्याय
किनवट, प्रतिनिधी : किनवट येथे लोकप्रिय आमदार मा. श्री. भीमरावजी केराम यांच्या शुभहस्ते ‘जिजाऊ बस’चा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला.
महिला व विद्यार्थिनींच्या दैनंदिन प्रवासासाठी अधिक सुरक्षित, सुलभ आणि सुविधाजनक पर्याय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेला हा उपक्रम परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विशेषतः शिक्षणासाठी व विविध कामानिमित्त प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनी आणि महिलांना या बससेवेचा मोठा फायदा होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी ‘जिजाऊ बस’ या उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत केले. महिलांच्या सन्मानाला प्राधान्य देत त्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी करण्यात आलेला हा उपक्रम निश्चितच स्वागतार्ह व कौतुकास्पद असल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.

आमदार भीमरावजी केराम यांच्या नेतृत्वाखाली किनवट-माहूर मतदारसंघात विकासकामांची सातत्यपूर्ण वाटचाल सुरू असून, जनतेच्या मूलभूत गरजा आणि सर्वसामान्यांच्या सुविधांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

“महिलांचा सन्मान, विद्यार्थिनींची सुरक्षितता आणि जनतेच्या सेवेसाठी विकासाची अविरत वाटचाल” या उद्देशाने सुरू करण्यात आलेली ‘जिजाऊ बस’ सेवा महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे