Ticker

6/recent/ticker-posts

आंबेडकर नगर गोकुंदा येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा बालकास चावा

आंबेडकर नगर गोकुंदा येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा बालकास चावा 
दिनांक ३०/१२/२०२५, मंगळवार
येथील श्रावस्ती बुद्ध विहाराजवळ दुपारी ३ वाजेच्या सुमारास एका पिसाळलेल्या कुत्र्याने घराबाहेर खेळत असलेल्या एका १२ वर्षीय मुलाचा जोरदार चावा घेतला. 
सदरील मुलाला तत्काळ सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. अशा मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा व चावा घेतलेल्या कुत्र्याला तत्काळ पकडण्यात यावे अशी मागणी नगरातील ग्रामस्थ ग्राम पंचायत प्रशासनाकडे करीत आहेत.