कोळंबलेला वीज वितरणाचा कारभार सुरळीत होण्यासाठी आमदार भीमराव केराम यांची मागणी
किनवट माहूर
किनवट व माहूर तालुक्यातील विजेचा लपंडाव व खोळंबलेली प्रलंबित कामे तसेच विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी अधिकारी व तांत्रिक वीज कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी आमदार भीमराव करावी यांनी महावितरणच्या मुख्य अभियंता कडे केली आहे
आमदार भीमराव कराम यांनी मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण नांदेड यांना दिनांक 11 जून रोजी दिलेल्या पत्रानुसार किनवट व माहूर येथे महावितरणचे दोन उपविभाग असून येथील उपकार्यकारी अभियंता असे दोन्ही पदे रिक्त आहेत परिणामी विद्युत विषयक कामे खोळंबून सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे तर किनवट माहूर हा आदिवासी बहुल भाग असून जबाबदार अधिकारी नसल्याने विभागाच्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नाही परिणामी ग्रामीण भागात 4 ते 5 दिवस वीज पुरवठा होत नसल्याचे वास्तव असल्याच्या नागरिकांकडून तक्रारी येत आहेत त्यामुळे एन पावसाळ्याचे दिवस असल्याने ग्रामीण भागात नियमित वीज सेवा मिळणे अत्यंत गरजेचे आहे
किनवट व माहूर या दोन्हीही उपविभागातील उपकार्यकारी अभियंता सहाय्यक अभियंता व तांत्रिक वीजकर्मचाऱ्यांची रिक्त पदे या सर्व पदांचा अनुशेष तातडीने भरून काढण्याची मागणी आमदार भीमराव केराम यांनी मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनी झोन कार्यालय नांदेड यांच्याकडे कडे लेखी पत्र देऊन केली आहे