Ticker

6/recent/ticker-posts

आदिवासी युवा समाज बांधवांच्या वतीने येणाऱ्या 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त नियोजना संदर्भात शासकीय विश्राम गृह गोकुंदा या ठिकाणी बैठक पार पडली

आदिवासी युवा समाज बांधवांच्या वतीने येणाऱ्या 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त नियोजना संदर्भात शासकीय विश्राम गृह गोकुंदा
या ठिकाणी बैठक पार पडली

सर्वप्रथम  भारतीय जनता पार्टी एसटी मोर्चा अध्यक्ष पदी संतोष कनाके व चिटणीस पदी अनिल संभाजी कनाके यांची निवड झाल्याबद्दल  आदिवासी युवा बांधवा तर्फे पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आले
दिनांक 20 जुलै 2025 रोजी आदिवासी युवा समाज बांधवांच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त नियोजना संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती व तसेच जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे ठरवण्यात आली आहे बाबुराव पुलेश्वर शेडमाके चौक किनवट येथे पुष्पहार अर्पण करून पैदल रॅली सुरुवात करून किनवट येथील सर्व महामानवांना पुष्पहार अर्पण करून क्रांतिवीर महामानव आदिवासी समाजाचे क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीची सांगता करायची आहे  जागतिक आदिवासी दिन मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोषात सगळ्या आदिवासी बांधवांनी साजरा करावा असे या बैठकीत ठरवण्यात आले