(मुंबई) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा ना. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दि 29 जुलै 2025 रोजी उपमुख्यमंत्री यांच्या दालनात आदिवासी विकास विभागाच्या विविध प्रलंबित विषयाबाबत बैठक संपन्न झाली या बैठकीत रस्ते निधी तात्काळ वितरित करणे,अंतर्गत भौतिकदृष्ट्या पूर्ण व प्रगतीपथावरील रस्ते, व पुलांच्या कामाची माहिती, रस्ते निधी वितरित करणे ,ठक्कर बाप्पा योजने करिता प्रलंबित प्रस्ताव मंजुरीसाठी अतिरिक्त निधी 200 कोटी देणे ,शासकीय आदिवासी विभागातील इमारती बांधकाम लेखाशीर्ष निधी, राज्यभरातील आदिवासी आश्रम शाळेमध्ये 5 वर्षे ते 10 वर्षावरील रोजंदारी वर्ग -3 व वर्ग-4 कर्मचाऱ्यांना बाह्य स्त्रोताद्वारे न घेता पूर्वीप्रमाणे रोजंदारीवर/ तासिकेवर घेणे या विषयावर चर्चा करण्यात आली, या बैठकीचे आमदार भीमराव केराम यांनी नेतृत्व केले. या बैठकीस अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, आदिवासी मंत्रालयाचे सचिव वाघमारे, यांच्यासह अनेक मंत्री अधिकारी उपस्थित होते यावेळी लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांनी ना. अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.