नांदेड रेल्वे स्टेशन येथे मानवी तस्करी विरोधी दिन साजरा
(नांदेड): जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान नांदेड ही जस्ट राइट्स फॉर चिल्ड्रन प्रकल्पा अंतर्गत बालकामगार, तस्करी, विवाह आणि लैंगिक शोषणाच्या स्वरूपात शोषित होणाऱ्या मुलांचे संरक्षण, सुटका आणि न्याय सुनिश्चित करण्यासाठी नांदेड जिल्हामध्ये सक्रियपणे काम करत आहे. मानवी तस्करी विरोधी दिनाचे औचित्य साधून नांदेड जिल्ह्यातील रेल्वे स्टेशन व बस स्थानक या ठिकाणी जावून
बाल तस्करी रोखण्यासाठी कायदा अंमलबजावणी करण्यासाठी विविध पोस्टर बॅनर व रेल्वे स्टेशन व बस स्थानक ठिकाणी ध्वनि रेकॉर्ड वाजवून जनजागृती करण्यात आली , प्रवाशांना, रेल्वे कर्मचारी, विक्रेते, दुकानदारांना आणि कुलींना बाल तस्करीची चिन्हे कशी ओळखायची आणि संशयित प्रकरणांची सुरक्षितपणे तक्रार कशी करायची याबद्दल संवेदनशील करण्यासाठी जनजागृती केली आली असून जागतीक मानवी तस्करी विरोधी दिन नांदेड शहरातील मुख्य रेल्वे स्टेशन प्रबंधक कार्यलय येथे घेण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्या आळने (जिल्हा बाल संरक्षण अधिकारी) प्रमुख पाहुणे ए.जी.मोरे (पीएसआय ह्यूमन ट्राफिकिंग सेल पोलीस अधीक्षक कार्यालय) माधवराव एम्.(पोलीस उपनिरीक्षक)स्वाती ठाकूर(पीएसआय जीआरपीएफ पोलीस स्टेशन नांदेड.)Asi D. हरजी (RPF नांदेड)
कल्पना राठोड ( संरक्षण अधिकारी)शितल वाघमारे व आशा धुळे(महिला पोलीस कर्मचारी)ऐश्वर्या शेवाळे दिपाली हिंगोले (चाईल्ड लाईन समनव्यक)आकाश मोरे इत्यादी मान्यवर उपस्थित कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश कुलकर्णी आभार प्रदर्शन आशा सूर्यवंशी यावेळी बालकांसाठी काम करणाऱ्या जिल्ह्यातील सर्व यंत्रणा एकत्र येऊन बाल तस्करीशी लढन्यासाठी येवून संवाद साधण्यात आला