Ticker

6/recent/ticker-posts

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा.आमदार भीमराव केराम यांचे महसूल प्रशासनास आदेश.

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा.
आमदार भीमराव केराम यांचे महसूल प्रशासनास          आदेश.
( संपादक प्रणय कोवे) तालुक्यात दिनांक 15 व 16 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे  किनवट माहुर तालुक्यातील नुकसानीची पाहणी करून झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याबाबत किनवट माहुर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांनी महसुल प्रशासनाला आदेश दिले आहेत.
मागील दोन दिवसांपासून किनवट माहुर तालक्यात सुरू असलेल्या संततधार पाऊस व ईसापुर धरणातील पाणी  नंदिपात्रात सोडल्याने पैनगंगा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाल्यामुळे नदि काठावरील शेती खरडुण गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे तसेच नदि नाल्याचे पाणी गावात शिरल्याने अनेकांच्या घराची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे तसेच अनेक जनावरे दगावली असतल्यामुळे दोन्ही तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. या बाबीची दखल घेउन किनवट माहुर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांनी किनवट व माहुर तहसीलदारांना तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक यांचेमार्फत  प्रत्यक्षजायमोक्यावर जाऊन नुकसानीची पाहणी करून झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत .
दोन्ही तालुक्यातील एकही नुकसानग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी अशा स्पष्ट सूचना आमदार केराम यांनी दिल्या आहेत किनवट माहूर तालुक्यात झालेली अतिवृष्टी व पैनगंगा नदिला आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये महायुती सरकार सर्व शक्तिनिशी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे.झालेल्या नुकसानीचे जायमोक्यावर जाऊन तात्काळ पंचनामे करण्याबाबत किनवट आणी माहुर तहसिलदारांना सुचना दिल्या आहेत. नुकसग्रस्तांना  शासनाकडून अनुदान मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे.