Ticker

6/recent/ticker-posts

आमदार भीमराव केराम यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

आमदार भीमराव केराम यांचे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र
किनवट माहूर तालुक्यातील बाधित शेतकरी व कुटुंबांना तातडीने अर्थसहाय्य द्या

(संपादक प्रणय कोवे) किनवट मागील तीन चार दिवसापासून किनवट माहूर तालुक्यात उदभवलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर आमदार भीमराव केराम यांनी दक्षतेने दोन्ही तालुक्याच्या नुकसानीचा आढावा घेत पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन नुकसानग्रस्तांना तातडीने अर्थसहाय्य देण्याची मागणी केली आहे
दिनांक 15 16 व 18 असे सलग तीन दिवस किनवट माहूर तालुक्यातील सर्वच महसुली मंडळात मुसळधार पावसाने थैमान घातले असून ईसापुर धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे नदी नाल्यांना पूर येऊन शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे पुराच्या पाण्यात शेतजमीन खरडून गेल्या आहेत तर नदीकाठच्या नागरी वस्त्यात पाणी शिरूर घरांची पडझड झाली मुसळधार पावसात जनावरे दगावली असून जीवितहानी झाली आहे या पार्श्वभूमीवर आमदार भीमराव केराम यांनी दक्षतेने किनवट माहूर या दोन्ही तालुक्यातील नुकसानीचा आढावा घेत महसूल प्रशासनाला शेती घर व जनावरांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत प्राथमिक अंदाजानुसार माहूर तालुक्यात 16327 शेतकरी बाधित होऊन 17283 हेक्टर वरील पिके खरडली आहेत 73 घरे व 1 दुधाळ जनावर वाहून गेले आहे किनवट तालुक्यात तब्बल 44356 शेतकरी बाधित झाले असून
कापूस सोयाबीन तूर मूग उडीद मका ज्वारी यासह विविध पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे बहुतांश ठिकाणचे पूल व रस्ते वाहून गेले आहेत पुरामुळे स्कूलबस चालकास दोघांचा मृत्यू झाला आहे बाधित शेतकरी व कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदत देणे कृषी निवेष्ठेच्या नुकसानीवर विशेष अनुदान तसेच रस्ते व पुल दुरुस्ती आणि धोकादायक ठिकाणी संरक्षण भिंती उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार भीमराव केराम यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे