*पुरोगामी पत्रकार संघ (भारत) चे मध्यप्रदेशातील प्रदेश कार्यालय उद्घाटन सोहळा येत्या रविवार, दि. २८ सप्टेंबर २०२५ रोजी छिंदवाडा येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील संघटनेचे अनेक मान्यवर* *पदाधिकारी आज छिंदवाडाकडे रवाना झाले आहेत.*
*संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. विजयजी सूर्यवंशी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. बाळासाहेब आढागळे, राष्ट्रीय संघटक मा. निलेश ठाकरे (चंद्रपूर), राष्ट्रीय प्रवक्ता मा. मारुती जाधव, विदर्भ विभागीय प्रसिद्धी प्रमुख मा.* *मनोज मोडक (चंद्रपूर), राष्ट्रीय प्रसिद्धीप्रमुख मा. प्रितमसिंग चौहान व राष्ट्रीय* *संपर्कप्रमुख मा. श्रावण पाटील हे मान्यवर उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.*
*
*प्रदेश कार्यालय उद्घाटन सोहळा छिंदवाडा शहरातील न्यू राजीव गांधी बसस्टॅण्डजवळ, आनंद हॉस्पिटल समोर, शॉप क्र. ३८ येथे होणार असून, कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष मा.* *विजयजी सूर्यवंशी यांच्या हस्ते संपन्न होईल. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. प्रदीपकुमार जुलमे (प्रदेश अध्यक्ष, म.प्र.) असतील.*
*या सोहळ्यात राज्य सचिव (म.प्र.) मा. मोहम्मद दानिश खान यांसह मध्यप्रदेशातील इतर* *पदाधिकारीही उपस्थित राहणार आहेत.*
*ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, चंद्रपूर, नागपूर आदी ठिकाणांहून महाराष्ट्रातील पदाधिकारी छिंदवाडा* *कार्यक्रमासाठी रवाना झाले असून, या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे सोहळ्यास वेगळे औचित्य लाभणार आहे.* *मध्यप्रदेशातील पत्रकार बांधवांमध्ये या उद्घाटनाबाबत प्रचंड उत्सुकता व आनंदाचे वातावरण आहे* .