दिल्ली येथे आमदार भीमराव केराम साहेबांनी केंद्रीय मंत्री श्री.नितीनजी गडकरी साहेब यांची भेट घेतली
आज दिल्ली येथील ट्रान्सपोर्ट भवन येथे केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री मा.श्री.ना. नितीनजी गडकरी साहेब यांची *लोकप्रिय आमदार श्री. भीमरावजी केराम* यांनी औपचारिक भेट घेतली.
या भेटीदरम्यान आमदार केराम यांनी किनवट शहरालगतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या बायपास मार्गासंबंधी सविस्तर चर्चा केली. तसेच श्रीक्षेत्र माहुरगड येथील श्री रेनुका माता मंदिर परिसरातील स्कायवॉक प्रकल्पाच्या संदर्भातही विस्तृत संवाद साधून त्याच्या लवकरात लवकर मंजुरीसाठी पाठपुरावा केला.
या वेळी आदिलाबादचे खासदार *श्री.घोडाम नागेश साहेब,* *श्री.अशोकराव मुस्तापुरे*
(प्रदेश कार्यकारणी सदस्य भाजपा तेलंगानाराज्य)
तसेच अनुसूचित जनजाती आयोगाचे वरिष्ठ अन्वेषक *श्री.गोवर्धन मुंडे सर* उपस्थित होते.