Ticker

6/recent/ticker-posts

किनवट माहूर आदिवासी बहुल मतदार संघातील शेतकऱ्यांचा कापूस तेलंगना राज्यातील आदिलाबाद येथे खरेदी करावा या करिता आमदार भीमरावजी केराम यांनी राष्ट्रीय जनजाती आयोगात केली होती तक्रार

किनवट व माहुर आदिवासी बहुल मतदार संघातील शेतकऱ्यांचा कापूस तेलंगनातील राज्यातील आदिलाबाद येथे खरेदी करावा या करिता श्री आमदार भीमरावजी केराम साहेबांनी* 

राष्ट्रीय जनजाती आयोगात तक्रार केली होती.त्या विषयात आज आयोगाच्या दिल्ली येथील कार्यालयात *अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष* *मा.श्री आंतरसीगजी आर्या साहेब* यांच्या समोर आज पेशी झाली. त्यास CCI चे जनरल मॅनेजरचे सुद्धा उपस्थित होते.
या विषयात आज झालेल्या सुनावणीत महाराष्ट्र व तेलंगणा या दोन्ही राज्यातील पणन तथा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांना नोटीस काढन्याचे आदेश देण्यात आले आहे.
तसेच पुढिल सुनावनी ही २९/१०/२५ ला आहे.
यामुळे किनवट परीसरातील शेतकरी आपला कापुस CCI ला आदिलाबाद येथे विक्री शकतील, त्यामुळे किनवट येथील शेतकऱ्यांना आर्थिक नफा होईल.