नांदेड जिल्ह्यात च्या किनवट तालुक्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय या ठिकाणी दिनांक 19-11- 2025 वार बुधवार रोजी किनवट माहूर प्रकल्पातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या किनवट तालुका अध्यक्षपदी गणेश बापूराव डोंगरे यांची फेर निवड करण्यात आली
शासनमान्य संघटनेचे राज्य अध्यक्ष मा. सुभाष बाळबुधे यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट माहूर प्रकल्पातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना पुनश्च स्थापन करून नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली यावेळी
फेरनिवडीमध्ये पुन्हा एकदा गणेश बापूराव डोंगरे शासकीय आश्रम शाळा तलाईगुडा यांना सवर्ग चार कर्मचारी यांच्या सहमतीने अध्यक्ष पद देण्यात आले सर्व चतुर्थश्रेणी कर्मचारी यांच्या सहमतीने ही संघटना स्थापन करण्यात आली
यावेळी मोठ्या संख्येने सर्व पदाधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष मा. सुभाष बाळबुधे यांनी माननीय आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी जेनित चंद्र दोन्तुला यांना निवेदन देऊन रोजंदारी कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यास त्यांच्या निदर्शनास आणून दिले तसेच नव्याने किनवट माहूर प्रकल्पातील चतुर्थश्रेणी वर्ग चार कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गणेश बापूराव डोंगरे यांनी सुद्धा प्रकल्पअधिकारी यांना वर्ग चार कर्मचारी यांच्यावर अतिशय कामाचा बोजा पडत आहे कर्मचारी कमी असल्यामुळे कर्मचाऱ्यावर तीव्र ताण तणाव निर्माण होत आहे व कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वेगवेगळ्या कामाच्या स्वरूपात अडीअडचणी त्यांच्या निदर्शनास आणून दिले नविन सुधारीत धुलाई भत्ता ' गणवेश शिलाई भत्ता / वॉचमन यांच्या भडचीनी / 10 ' 20 ' 30 ' आश्वासीत प्रगति योजनेचा लाभ / आणि आता तात्काळ कामावर रोजनदारी नुसार कर्मचारी नेमण्यात यावे असे पाच मुद्दे माननीय प्रकल्प अधिकारी यांच्याशी चर्चा करून प्रलंबित प्रश्न सोडविण्यास सांगितले प्रकल्प अधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत समस्या सोडविण्यासंदर्भात आश्वासित केले
यावेळी अध्यक्षपदी गणेश बापूराव डोंगरे, उपाध्यक्षपदी एम.व्ही वानोळे, उपाध्यक्षपदी श्रीमती व्ही एस मस्के, प्रतिनिधी एसएस कलेमपल्लू, कार्याध्यक्षपदी एम के गजभारे, उपकार्याध्यक्षपदी आशिष बी मडावी, कोषाध्यक्षपदी बी एस पांचाळ, उपकोषाध्यक्षपदी ए जे परचाके, सचिव पदी एम एस लोदे, सहसचिवपदी एम एस देवताळे आदींची नियुक्ती करण्यात आली या निवडीबद्दल सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने अभिनंदन करून पुढील कार्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या