राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा आठवा वर्धापन दिन मंगळवार, दिनांक 30 डिसेंबर रोजी ऐतिहासिक बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या उत्साहात व दिमाखात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.
यावेळी संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब आढागळे यांनी भारतीय संविधान व देशाच्या उद्देशिकेचे सामायिक वाचन करून कार्यक्रमाला वैचारिक अधिष्ठान दिले. त्यानंतर संघाच्या आठ वर्षांच्या कार्याचा सविस्तर आढावा राज्य सचिव दत्ता मुजमुले यांनी अत्यंत प्रखर व अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडला.
या कार्यक्रमाला बुलढाणा जिल्ह्याचे आमदार संजय भाऊ गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांच्या मूलभूत हक्क व गरजांबाबतचे सविस्तर निवेदन (मागणीपत्र) आमदार संजय भाऊ गायकवाड यांना अधिकृतपणे सादर करण्यात आले. या निवेदनात पत्रकारांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व सुरक्षिततेशी संबंधित महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या.
पत्रकारांच्या प्रमुख मागण्या
अधिस्वीकृत/मान्यताधारक पत्रकार निवडीसंदर्भात राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा अंतर्भाव करण्यात यावा.
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांना टोल माफी देण्यात यावी.
पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य जीवन विमा, विशेष आरोग्य सेवा तसेच दुर्धर आजारांसाठी स्वतंत्र पत्रकार आरोग्य निधीचा लाभ देण्यात यावा.
पत्रकार गृहनिर्माण सोसायटीसाठी शासकीय मालकीच्या जमिनी उपलब्ध करून देत, गृहनिर्माणासाठी शासनाने किमान 50 टक्के निधी उपलब्ध करून द्यावा.
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ ही स्वयंसेवी संस्था (NGO) असल्याने केंद्र व राज्य शासनाच्या विविध मंत्रालयांच्या योजनांचा लाभ संघास देण्यात यावा.
दरवर्षी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघास देण्यात यावा.
संघाच्या ओळखपत्राच्या आधारे पत्रकारांना मोफत प्रवास सेवा उपलब्ध करून द्यावी.
पत्रकारांच्या मुलांना केजी ते पीजीपर्यंतचे मोफत शिक्षण, शिष्यवृत्ती व वसतिगृह सुविधा देण्यात याव्यात.
मार्गदर्शन करताना आमदार संजय भाऊ गायकवाड यांनी सांगितले की, “मी कायमच पत्रकारांच्या पाठीशी आहे. पत्रकारांच्या प्रश्नांसाठी पहिला आवाज उठवणारा आमदार म्हणून येणाऱ्या अधिवेशनात या सर्व मागण्या मान्य व्हाव्यात, यासाठी संबंधित मंत्र्यांकडे ठोस पाठपुरावा करणार आहे.” तसेच राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे कार्य महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता संपूर्ण भारतात सुरू असल्याबद्दल त्यांनी राज्याध्यक्ष विष्णू कंकाळ, संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी व सर्व पत्रकारांचे तोंडभरून कौतुक केले.
संघाचे सल्लागार डॉ. सुरेंद्र शिंदे यांनी समाजघडणीत महामानवांच्या माता व महापुरुषांचे योगदान अधोरेखित करत, त्याच विचारधारेतून राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ कार्यरत असल्याचे मत व्यक्त केले.
संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकर सिंह ठाकुर यांनी संघ हा कोण्या एका व्यक्तीचा नसून सर्व पत्रकारांचा असल्याचे सांगत, एक ध्येय व एक विचार घेऊन संघाची वाटचाल संपूर्ण देशात यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी विविध संघटनांतील पत्रकार व मान्यवरांनी राज्याध्यक्ष विष्णू कंकाळ यांच्या नेतृत्वाचे तोंडभरून कौतुक केले. ज्येष्ठ पत्रकार रणजितसिंग राजपूत यांनी पुरोगामी विचारधारा महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला दिशा देणारी असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी आयोजक राज्याध्यक्ष विष्णू कंकाळ, त्यांची संपूर्ण टीम व कुटुंबीयांचे मनःपूर्वक कौतुक केले. स्वखर्चाने उपस्थित राहिलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानत त्यांनी सांगितले की, पत्रकारांचा स्वाभिमान व अभिमान टिकवण्याचे काम राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ सातत्याने करत आहे. 2017 ते 2025 या कालावधीतील संघाचा प्रवास संघर्षातून यशाकडे गेलेला असून, आज छोटेसे रोपटे वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. 2026 साठी संघाची पुढील वाटचाल पत्रकार तसेच समाजातील सर्व घटकांचे प्रश्न घेऊन अधिक जोमाने केली जाईल व लवकरच नवीन राज्य कार्यकारिणी जाहीर केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर व पदाधिकारी
*आमदार संजय भाऊ गायकवाड* ,
संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी,
राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब आढागळे,
राष्ट्रीय प्रमुख सल्लागार सुभाष बिंदवाल,
राष्ट्रीय महासचिव विनोद पवार,
राष्ट्रीय सचिव प्रवीण परमार,
राष्ट्रीय सल्लागार डॉ. सुरेंद्र शिंदे,
राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू कंकाळ,
राज्य कार्याध्यक्ष शंकर सेवा ठाकूर,
आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष प्रणय कोवे
ज्येष्ठ पत्रकार रणजितसिंग राजपूत,
राज्य प्रवक्ता मारुती शिखरे,
राज्य सचिव दत्ता मुजमुले,
अन्याय अत्याचार निवारण समितीचे राज्याध्यक्ष दत्ता पाटील,राज्य कार्याध्यक्ष प्रमिला आढागळे,
विदर्भ विभागीय अध्यक्ष मनोज मोडक,
उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष हंसराज बाबा वाघ,
सरोज पवार, रायगड जिल्हा सचिव राजपाल शेगोकार,
रायगड जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गायकवाड,
अन्याय अत्याचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष अश्विनी ठाकूर, उरण तालुका कार्याध्यक्ष प्रवीण नाईक,
संघटक अलंकार कडू,
खालापूर तालुका अध्यक्ष बाळाराम सावंत,
संतोष ठाकूर, निर्णय पाटील,
ठाणे जिल्हाध्यक्ष श्रावण पाटील,
हिरादास सोनावले, विलास सावंत
यांच्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील अनेक पदाधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी राज्याध्यक्ष विष्णू कंकाळ यांनी उपस्थित सर्व मान्यवर, पदाधिकारी, पत्रकार बांधव तसेच सूत्रसंचालन करणाऱ्या युवकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.